वैद्यकीय माहितीपूर्ण संमती प्रपत्राचे उलटे भाषांतर(बॅक ट्रान्सलेशन)
Thread poster: Anil Karambelkar
Anil Karambelkar
Anil Karambelkar  Identity Verified
India
Local time: 11:10
Member (2011)
English to Marathi
+ ...
Mar 17, 2013

एका एजन्सीसाठी हे काम करताना त्यांनी असे भाषांतर मूळ दस्तावेजाशी जुळते होईल असे दुरुस्त करण्याची मागणी केल्यामुळे मी हे लिहीण्यास प्रवृत्त झालो आहे. याबाबत अनुभवी मराठी भाषातरकारांचे मत ... See more
एका एजन्सीसाठी हे काम करताना त्यांनी असे भाषांतर मूळ दस्तावेजाशी जुळते होईल असे दुरुस्त करण्याची मागणी केल्यामुळे मी हे लिहीण्यास प्रवृत्त झालो आहे. याबाबत अनुभवी मराठी भाषातरकारांचे मत आणि अनुभव काही असल्यास मी जाणून घेऊ इच्छितो.

उलटे भाषांतर करण्याचा उद्देश माझ्या मते अंतिम ग्राहकाला सर्व भाषांचे ज्ञान नसल्यामुळे विशिष्ट भाषेतील भाषांतर मूळ दस्तावेजातील अर्थ रुग्णांपर्यंत पोचविते आहे किंवा नाही हे कळावे हा आहे. परंतु ते जर मूळ दस्तावेजाशी जुळते करायचे तर या उद्देशालाच हरताळ फासला जातो आणि अंतिम ग्राहकाचा त्या विशिष्ट भाषेतील भाषांतर योग्य आहे असा होऊ शकतो. कुठल्याही भाषेची स्वतःची एक शैली, शब्दरचना, वाक्यरचना असते ती इंग्रजीशी मिळती जुळती असेलच असे नाही. पण अर्थ बरोबर असणे महत्त्वाचे आहे. परंतु स्वतःचा वेळ किंवा पैसे वाचविण्यासाठी काही एजन्सी अशी मागणी करतात असा अनुभव आहे. परंतु हे चुकीचे आणि ग्राहकाची फसवणूक करणारे आहे, कायदेशीर समस्याही उद्भवू शकतात.
Collapse


 
Milind Joshi
Milind Joshi  Identity Verified
Local time: 11:10
Member (2013)
Japanese to English
+ ...
Back Translation Mar 17, 2013

Form (letter?) of consent including medical information

 
Varsha Pendse-Joshi
Varsha Pendse-Joshi  Identity Verified
United States
Japanese to English
+ ...
अद्याप अनुभव नाही Feb 27, 2014

>>>परंतु ते जर मूळ दस्तावेजाशी जुळते करायचे तर या उद्देशालाच हरताळ फासला जातो

खरं आहे. मला अद्याप कुठल्याही बॅक ट्रान्सलेशनच्या बाबतीत सुदैवाने असं सांगण्यात आलेलं नाही. पण हे अतिशय अयोग्य आहे यात शंकाच नाही.


 
Anil Karambelkar
Anil Karambelkar  Identity Verified
India
Local time: 11:10
Member (2011)
English to Marathi
+ ...
TOPIC STARTER
Feb 28, 2014

हा कदाचित माझा एकट्याचा आणि तोही एकमेव अनुभव असू शकेल. पण या व्यववसायात काम करताना प्रत्येक अनुवादकाला काही ना काही बरे वाईट अनुभव येत असतात, ते सर्वांच्या माहितीसाठी इथे देणे योग्य वाटले. किंबहुना सर्वांनीच तसे करावे असे वाटते. त्याचा कधी कधी फायदाही होतो.

 


There is no moderator assigned specifically to this forum.
To report site rules violations or get help, please contact site staff »


वैद्यकीय माहितीपूर्ण संमती प्रपत्राचे उलटे भाषांतर(बॅक ट्रान्सलेशन)






Trados Business Manager Lite
Create customer quotes and invoices from within Trados Studio

Trados Business Manager Lite helps to simplify and speed up some of the daily tasks, such as invoicing and reporting, associated with running your freelance translation business.

More info »
TM-Town
Manage your TMs and Terms ... and boost your translation business

Are you ready for something fresh in the industry? TM-Town is a unique new site for you -- the freelance translator -- to store, manage and share translation memories (TMs) and glossaries...and potentially meet new clients on the basis of your prior work.

More info »